आष्टी(प्रतिनिधी) येथील दै .युवा सोबतीचे पत्रकार जावेद पठाण यांची कन्या अलिशा जावेद पठाण हिने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी)च्या परिक्षेत 94% गुणाने उत्तीर्ण होत दहावीत घवघवीत यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थिनी कु. अलिशा जावेद पठाण हिने 94.00% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
अलीशा च्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे तिने सांगितले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व पत्रकार, सामाजिक ,राजकीय, शैक्षणीक स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकवृंदांनी तीचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.