spot_img
spot_img

मराठा आरक्षण मिळूपर्यत मुस्लिम मावळा समीर शेख करणार नाही वाढदिवस साजरा

आष्टी प्रतिनिधी:- मराठा बांधव हा आमचा मोठा बंधू असल्यामुळे ,मराठा आरक्षण मिळण्यासाठी माझ्या मराठा बांधवांचा लढा चालू असल्यामुळे.. माझा वाढदिवससा निमित्त हार,तुरे, फेटा बांधणार नाही व केक कापणार नाही असा निर्णय घेतला आहे यांचे कौतुक होत आहे.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील समीर बादशहा शेख यांचा वाढदिवस 26/10/2023 रोजी आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे समीर शेख हार,तुरे,फेटा बांधनार नाही व केक कापणार नाही समीर शेख यांनी 5 सप्टेंबर रोजी मोटरसायकलवर 180 किमी जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा दिला होता तसेच मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे, मराठा योद्धा,मराठा क्रांतीसुर्य. मा.मनोज जरांगे पाटील यांच्या 14/10/2023 रोजी अंतरवाली सराटी येथे सभेला उपस्थित राहिले होते,तसेच ते सामजिक क्षेत्रात अग्रेसर असतात, निस्वार्थीपणे लोकांच्या मदतीला धावून जातात.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!