आष्टी(प्रतिनिधी)-राज्यात ॲग्री स्टॅक योजने अंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करुन शेतकऱ्यांना त्याचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभाग,शासन निर्णय दि.11 एप्रिल, 2025 अन्वये यापुढे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. 15/04/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला असून,ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) साठी नोंदणी केलेली नाही.त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी शेतकऱ्यांनी ग्राम कृषी विकास समिती व आपले जवळचे आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेवून नोंदणी करुन घ्यावी,नसता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही,त्यांना शेती योजनेचा लाभ होणार बंद अशी माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.
आष्टी तहसिल कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात तहसिलदार वैशाली पाटील म्हणाल्या,नुकतीच मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे ॲग्री स्टॅक विषयी आढावा बैठक घेतली असता आष्टी तालुक्यामधील एकूण 69 हजार 827 शेतकऱ्यांपैकी अॅग्री स्टॅक अंतर्गत फार्मर आय डी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी झ गलेल्या शेतकऱ्यांची संख्या 47हजार 652 इतकी असून अद्यापही 22 हजार 175 शेतकऱ्यांनी फार्मर आय डी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी केली नसल्याचे दिसून आले असून,तालुक्यातील उर्वरित 22 हजार 175 शेतकरी यांनी दि. 01/05/2025 पर्यंत जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र सेतु केंद्रावर जावून फार्मर आय डी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी करुन घ्यावी.फार्मर आ य डी (शेतकरी ओळखपत्र) म्हणजे शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतक-याने पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चिती करुन माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांची कार्यक्षमतापूर्ण अंमलबजावणी करणे होय. यापुढे भविष्यातील सर्व शेतकरी विषयक योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.