आष्टी (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानोरा येथील जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे जनता विद्यालयात येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 20 एप्रिल रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जनता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त इमारतीमध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमास धानोरा व परिसरातील सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई, सचिव विजयकुमार (अण्णा) बांदल, व्यवस्थापक विशाल (भैय्या) बांदल, मुख्याध्यापक सय्यद युनूस (राजू मास्टर), उपमुख्याध्यापक ढोबळे सर, पर्यवेक्षक सय्यद अय्युब सर, तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील अनेक प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री सय्यद अय्युब सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गरजेच्या सुधारणा, दिशा-दशा आणि येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर अशी माहिती दिली.
संस्थेचे व्यवस्थापक विशाल भैय्या बांदल यांनी पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून शाळेच्या वाटचालीबाबत सकारात्मक विचार मांडले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पठाण सर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री झांजे सर यांनी केले.
या कार्यक्रमास योगेश बेद्रे, ईश्वर शेळके, सतीश काळे, अजीम सय्यद, गणेश काळे, इलियास सय्यद, तुषार शेळके आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.