नगर (प्रतिनिधी):- काही विद्यार्थ्यांना मध्ये गुण – हुशार असुन केवळ आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण घेणे कठीण होत.म्हणुन तुषार बोरुडे यांच्याकडून अहील्यानगर येथील पालघर प्रक्लप येथील ४० अनाथ विद्यार्थींना शालेय साहित्य व खाऊ वाटण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनचे शिक्षण थांबले आहे त्या विद्यार्थ्यांनासाठी अनाथ सेवक या संस्था मार्फत आम्ही प्रामाणिक सेवा करत आहोत, अनाथ गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, अंध अपंगांना मदत, अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांनंतर आता शैक्षणिक मदत हा उद्देश डाेळ्यासमाेर ठेऊन अडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे आदर्श कार्य समाजसेवक तुषार बोरुडे या युवकाने हाती घेतले आहे.कोणत्याही परिस्थिती मध्ये होतकरू, गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी आम्ही फुल न फुलांची पाकळी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे
स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. घर व परिसर आपला स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोरुडे यांचे सांगितले.
➡️ तुषार बोरुडे यांचे काम कौतुकास्पद आहे. अतिशय कमी वया मध्ये त्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे. त्यांचे समाजकार्य असेच अखंड चालत राहो आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा – संचालक युवराज गुंड ( पालघर प्रक्लप अहिल्यानगर )