spot_img
spot_img

शनिवारी होणाऱ्या “शाळा प्रवेशोत्सव” समारंभास पालकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा – सरपंच अर्चना मोहन आमटे

कडा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील पिंपरी(घाटा)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी घाटा केंद्र देवळाली मध्ये शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ समारंभ शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ ला सकाळी ९ वा. संपन्न होणार आहे . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी घाटा येथे नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांचे स्वागत करून प्रवेशोत्सव समारंभ साजरा करण्यात येणार आहे या समारंभास मा. श्री सुधाकर यादव साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आष्टी) यांची उपस्थिती लाभणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या बालकांची बैलगाडीतून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात येणार असून पुष्पगुच्छ आणि पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या शुभहस्ते बालकांचे स्वागत करून हार्दिक शुभेच्छांचा कार्यक्रम साजरा होणार आहे या कार्यक्रमात मुलांना टोपी पाऊलखुणा साहित्याची ओळख यासारखे आनंददायी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे
मा. आ. सुरेश धस (मा. मंत्री महाराष्ट्र शासन) यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी ने केली आहे या शाळेत पहिली ते सातवी सेमी इंग्लिश पॅटर्न अभ्यासक्रम सुरू असून अतिशय दर्जेदार शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जात आहे तसेच या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे आश्वासन पिंपरीच्या सरपंच सौ अर्चना मोहन आमटे यांनी दिले आहे तरी पिंपरी आणि परिसरातील पालकांनी या समारंभाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरीच्या सरपंच सौ अर्चना मोहन आमटे यांनी केले आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!