spot_img
spot_img

श्रुतिगंध वेदपाठशाळा; बीड.चा विद्यार्थी चि.श्रीकृष्ण गोविंद जाटदेवळेकर कांचीकामकोटि पीठाच्या परीक्षेत भारतात दुसरा

देवळाली (वार्ताहार) कांचीकामकोटिशंकराचार्य पीठाच्या; वेदरक्षण निधी ट्रस्ट चेन्नई द्वारा; घेण्यात आलेल्या “विजयादशमी २०२३” च्या परीक्षेतील ऋग्वेद पदपाठ- क्रमपाठ या परीक्षेला यंदाच्या वर्षी संपूर्ण भारतातून ३२  विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या परीक्षेत श्रुतिगंध वेदपाठशाळा, बीड. चा विद्यार्थी चि.श्रीकृष्ण गोविंद म.जाटदेवळेकर ९५.१९ % गुण प्राप्त करून भारतात दुसरा आला.कांचीकामकोटिपीठाधीश श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्रीश्री १००८ शंकरविजयेंद्रसरस्वती स्वामींच्या हस्ते विजयादशमी च्या दिवशी श्रीरामजन्मभूमि अयोध्या  येथे ; प्रमाणपत्र, वस्त्र, आणि रोख रक्कम देऊन “क्रमपाठी” या पदवीने गौरविण्यात आले .”ऋग्वेद संहिता ” (मंत्र संख्या  -१०,५५२ /=(दहा हजार पाचशे बावन्न ) या ग्रंथाची पदे (पदपाठ संख्या१,५०,००० दीड लाख  ) आणि याच पदपाठाचा क्रमपाठ म्हणजे ; याला दुप्पट करून एका विशिष्ट पद्धतीने म्हणणे ; हे एक आत्यंतिक परिश्रमाचे  अध्ययन आहे.ही परीक्षा देऊन उत्तम श्रेणी  प्राप्त केल्याबद्दल श्रुतिगंध वेदपाठशाळा ;बीड. चे सर्व पदाधिकारी ,वेदभक्त, हितसंबंधी,छात्र आणि सर्व परिवार भूरिभूरि अभिनंदन करत आहे.बालपणी आई- वडील , आजी-आजोबा, संबंधी नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांच्या प्रेमपाशाचा त्याग करून गुरूगृही वेदाध्ययनादी विषयात  अपरिमित कष्ट करून मिळविलेले यश हे खरोखर कौतुकास्पद आहे.जिथे आपल्याला हरिपाठ-विष्णुसहस्त्रनाम – भगवद्गीता अथवा एखादे  संस्कृतस्तोत्र मुखपाठ होणे अवघड आहे तिथे एवढे मंत्र पाठ म्हणणे आणि ते ; ही (ज्यांना आपली भाषाही समजत नाही; अशा ) केवळ “वेदांची” च भाषा जाणणा-या अपरिचित परीक्षका समोर एवढे (उपरोक्त) मंत्र मुखोद्गत म्हणून त्यात *“क्रमपाठी “* ही पदवी मिळविणे हे त्याच्या  वेदांसाठी अहोरात्र केलेल्या कष्टांचेच फलित आहे.चि.श्रीकृष्णाने ;  (जाटदेवळेकर) या स्वकुलाला साजेसा असा  आणि श्रुतिगंध वेदपाठशाळा;बीड. च्या वेदकार्याच्या यशात स्वकष्टाने जो ; एक “मानबिंदू ” रोवला ; त्या बद्दल त्याचे आणि वेदासाठी – धर्मासाठी आपल्या “अपत्य प्रेमाचाही” त्याग करून त्याला या “वेदशिक्षणासाठी” पाठविणारे त्याचे आजी – आजोबा म्हणजे पूज्यश्री मुकुंदकाका – काकू , आणि आई- वडील सौ .मंजिरी व वेद – पितृभक्त गोविंद महाराज यांचे पुनश्चैकवार सहर्ष – अभिनंदन तसेच चि.श्रीकृष्णाला पुढील अध्ययनासाठी आणि अनेकानेक वेद-परीक्षांसाठी अनेकानेक शुभेच्छा-आशीर्वाद आणि वेदपुरुष भगवान दत्तात्रेयांचे चरणीं प्रथित यशाकरितां  प्रार्थना ….! चि.श्रीकृष्णाच्या या यशामुळे त्याच्या वर सर्व थरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!