spot_img
spot_img

महादेव कळसाईत यांचे अल्पशा आजाराने निधन

कडा(प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव येथील श्री.महादेव रामभाऊ कळसाईत यांचे सोमवार दिं.१४ एप्रिल २०२५रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले महादेव कळसाईत हे परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व मनमिळावू स्वभावाचे होते ते सतत लोकांच्या सुखदुःखात सहभागी असायचे. ते सेवा सहकारी सोसायटी चे संचालक म्हणून कार्यरत होते. श्री महादेव कळसाईत यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले. एक भाऊ, तीन बहिणी ,सुना , नातवंडे व नातसून असून आजही कळसाईत कुटुंब एकत्र आहे.त्यापैकी मुलगा श्री बबन कळसाईत शिक्षक आहेत तर दुसरा मुलगा विष्णू कळसाईत एसटी कंडक्टर आहेत. तसेच प्रवीण व वैभव हे दोन नातू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत.कै.महादेव कळसाईत यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.२३एप्रील२०२५ रोजी सकाळी ८.००वाजता सराटे वडगाव,ता.आष्टी जि.बीड येथे होईल.दशक्रीया विधी निमित्त ह.भ.प बबन महाराज बहिरवाल(अध्यक्ष – मदन महाराज संस्थान कडा)यांचे प्रवचन होणार आहे कै.महादेव कळसाईत हे सतत सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असायचे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!