आष्टी (प्रतिनिधी):- दि.15 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर विभागातील आठ जिल्ह्यांमधील 349 संगणक प्रशिक्षक यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या विषयाशी अनुसरून एक दिवशीय कार्यशाळा मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. आधुनिक युगात टीकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकाशी मैत्री करावी लागेल व त्याच्यासाठी त्यांना संगणक हाताळण्याची सवय लावण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील डिजिटलायझेशन विषयीची भीती दूर करण्यासाठी,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक माननीय श्री संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातील 647 शाळा व गटसंधान केंद्र येथे संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक प्रशिक्षक देण्यात आले असून त्यांना मार्गदर्शनासाठी ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.