spot_img
spot_img

देवळाली मध्ये सरकारी नोकरी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर ११००० रुपये देऊन करणार सन्मान ————————————— सैन्य दलात निवड झालेल्या दिनेश देशमाने ठरला पहिला सत्कार मुर्ती

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली गावातील मुले मुली सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होताना दिसत आहे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष साध्य करता येते यासाठी मोठा वारसा असलाच पाहिजे असे नाही याचे उदाहरण म्हणजे देवळाली गावातील शेतकरी कुटुंबातील मुले मुली एमपीएससीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत आहे यामुळे देवळाली गावाची मान उंचावली आहे अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी देवळाली गावातील संभाजी तांदळे सर यांनी मुलांना प्रोत्साहन पर ११ हजार रुपये देण्याचा संकल्प केला आहे यामुळे मुलांना प्रेरणा मिळून ते अधिक उत्साहाने अभ्यास करू लागतील आणि विविध ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करते आपल्या मित्रांपेक्षा चांगल्या पदावर नोकरी कशी मिळेल याची चुरस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे आणि म्हणून फूल न् फुलाची पाकळी म्हणून संभाजी तांदळे सर यांनी हा संकल्प केला आहे की देवळाली गावामधील ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागेल त्यांना ११००० रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे आणि यातून प्रेरणा घेऊन भविष्यात असंख्य विद्यार्थी हे नोकरीसाठी प्रयत्न करतील याची सुरुवात म्हणून नुकत्याच सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या दिनेश भाऊसाहेब देशमाने या विद्यार्थ्यास पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले आहे
संभाजी तांदळे सरांनी या केलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!