spot_img
spot_img

यशवंत पुलाटे यांना स्व हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान

लोणी प्रवरा (प्रतिनिधी): दुर्गापुर ता.राहता येथील ग्रामीण साहित्यिक व कवी.शारीरिक मर्यादांच्या महामार्गावर यशस्वी वाटचाल करणारे यशवंत पुलाटे हे प्रवरा परिवाराच्या सामाजिक , सास्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाचे उत्तम सकारात्मक उदाहरण आहेत. असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय हिराचंद ब्राह्मणे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शब्दगंध साहित्यिक परिषद राहाता तालुक्याच्या वतीने यशवंत पुलाटे यांना स्वर्गीय हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विचारपिठावर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी पोलीस अधिकारी कवी सुभाष सोनवणे,माजी प्राचार्य डॉ. पवार, संयोजक व राहाता पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष ब्राह्मणे आदि उपस्थित होते
यशवंत पुलाटे यांनी परमाणू विज्ञान अभियांत्रिकी पदविका प्राप्त केलेली आहे व ते महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दाढ बु येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदी कार्यरत होते.
त्यांच्या कार्याची अनेक राज्य पातळीवरील संस्थानी दाखल घेवून त्यांना अनेक पुरस्कार देवून गौरविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जागतिक मानवाधिकार सघटना ठाणेचा ‘साहित्य सौरभ’ राज्य साहित्य पुरस्कार , महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स्व .शांतिकुमार फिरोदीया साहित्य पुरस्कार अ.भा.शेतकरी साहित्य महामंडळाचा विश्वस्तरीय काव्यलेखन पुरस्कार श्रद्धा ग्राम प्रतिष्टांणचा साईरत्न साहित्य सेवा पुरस्कार आदीं पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.तसेच संजीवनी खोजे राज्य पुरस्कार निवड समितीचे सद्स्यपद , महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या श्रीरामपूर शाखेच्या जिल्हा कविसमेलन अध्यक्षपद साहित्य अकादमी मुंबई कविसंमेन निमंत्रित कवी म्हणून सहभाग राहिला आहे. महाराष्ट्रातले मान्यवर दिवाळी अंक , आकाशवाणी, दूरदर्शन ,मान्यवर वृत्तपत्रे विभागीय व अखिल भारतीय साहित्य संमेलने यामधील त्यांचा साहित्य सहभाग दुर्गापुरचा व प्रवरा परिवारचा अभिमानाचा विषय ठरला आहे कारण ते स्वतःची ओळख अभिमानाने Made in Pravara अशी करून देणारे प्रवरेचे साहित्यिक व सर्व शिक्षण प्रवरेच्या विद्यालय व कॉलेजमध्ये घेतलेले विदयार्थी आहेत.
जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑन लाईन कवी संमेलनात त्यांच्या नगरी बोलीतील सालचंदीचे वैभव ही कविता स्वतः मागवून जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व पिलानी इन्स्टिट्यूट राजस्थानच्या सोशल इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ भाऊसाहेब बोत्रे यांनी जागतिक व्यासपीठावर सादरीकरण करून अनोखा गौरव केला. कुसुमाग्रज व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी गौरविलेला ‘जन्मझूला’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्रवरा कामयुनिटी रेडिओची संकेत धून नाते जुळवू या मातीच्या मनाशी या आज ग्लोबल झालेल्या रेडिओमुळे देशाबाहेर पोहचली आहे. साहित्यिक,सांस्कृतिक , अध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातिल एक सहज संवादी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत . ग्रामीण माती आणि माणसे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी ‘नगरी माणसे व नगरी बोली’ ला प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न मान्यवर दैनिकाच्या स्तभ् लेखनातून सलग चार वर्षे त्यांनी केला.
त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव शब्दगंध चे सुनील गोसावी व प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केला. यावेळी भास्कर दादा लगड, फ्रान्सिस पाळंदे, सुमेध ब्राह्मणे, सुमेध वाघमारे, डॉ संदीप तापसे, आनंदा साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!