spot_img
spot_img

नौकरी सोडली, दुग्धव्यवसाय निवडत केली प्रगती ,दररोज चारशे लिटर दुध विक्री

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील कडा येथील योगेश कर्डीले यांच्या दुध व्यवसायाची यशोगाथा
पदवीनंतर अहिल्यानगर येथील कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी केली. एक वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतःचे काहीतरी करायची इच्छा निमाण झाली अन्‌ नोकरी सोडून
तो गावी परततो. घरी वडिलोपार्जित जामीन;
दोन गाई घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु होतो. तीन वर्षात तीस गाई घेऊन दररोज ४०० लीटर दुध, खर्च वजा जाता दोन लाख रुपये दरमहा उत्पन्न घेत या युवकाने स्वतःला सिध्द केले आहे. कडा (ता.आष्टी) येथील योगेश मोहन कर्डीले
यांचा हा दुग्धव्यवसाय आज अनेकांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देत आहे.
कडा येथील योगेश कर्डीले याने विज्ञानात पदवी मिळवली अन्‌ त्यानंतर नगरला कंपनीत सतरा हजार रुपये महिन्याची नोकरीही केली. नौकरित या काळात योगेशने कंपनीत नौकरीतील कष्ट व मिळणारा पगार यातील फरक अनुभवला.काही दिवस नौकरी केल्यावर घरी जाऊन जर शेतीला जोडधंदा केला तर आपण स्वतः मालक बनून राहू असा विचार केला. कडा येथे स्वतःची बागायती
शेती असल्याने तिथेच दूध धंदा उभारता येईल, असा निश्‍चय मनाशी केला. चांगली नोकरी सोडून गावाकडे आला.सुरवातीला घरातील लोकांनी विरोध केला. मात्र,योगेशचा निश्‍चय पाहून त्यांनीही प्रोत्साहन दिले. घरी वडिलांचा परंपरागत दुग्ध व्यवसाय होता दोन गाईचे दूध डेरीवर घालायचे व शेतीमध्ये ज्वारी गहू हरभरा बाजरी असे पीक घेत होते. हीच पद्धत बदलून योगेशने 2022 सालापासून टप्प्याटप्प्याने गाई घेऊन दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. आज योगेश कडे तीस जर्सी गाई असून दररोज चारशे लिटर दूध डेअरीला जात आहे. घरी 100 बाय 100 ची संरक्षण भिंत बांधून 80 बाय 30 चे शेड उभारत उर्वरित जागेत मुक्त गोठा केला. गाईंचे संगोपन करण्यासाठी आई नंदाबाई वडील मोहन व पत्नी कोमल या गाईंचा सर्व गोठा सांभाळत आहेत. पाच एकर शेतीमध्ये गाईंना चाऱ्याची सोय केली असून मका ऊस गवत वैरण आधी चारा घेतला जातो. विहिरीतील पाण्याद्वारे गाईंची देखभाल केली जाते. गाईंना गोळी पेंड भुसा यासारखे खाद्य देऊन त्यांची तब्येत गुबगुबीत ठेवण्यात योगेशला यश आले. दररोज मिळणाऱ्या चारशे लिटर दुधापासून योगेशला दोन लाख रुपये महिना निव्वळ शिल्लक राहत आहे. कंपनीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली राहून वीस हजार रुपये महिन्यात घेण्यापेक्षा आज योगेश स्वबळावर उभा राहिला असून कंपनीतील पगारापेक्षा कितीतरी पटीने हं
जास्त पैसे मिळवत असून तेही स्वतःच्या कष्टाने व सुखामध्ये.शिवाय कुटुंबासोबत राहून मन रमत असल्याचेही योगेशने सांगितले. नोकरीपेक्षा स्वतः व्यवसाय करायला शिकले तर नवयुवकांची नक्कीच प्रगती होऊ शकते. भविष्यात आणखी दुग्ध व्यवसाय वाढवून एक हजार लिटर दूध दररोज उत्पादन करण्याचा योगेशचा मानस आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून शिवाय उर्वरित शेतीसाठी शेणखत ही मुबलक प्रमाणात मिळत असल्याने गहू ज्वारी कांदा यासारखे पीकही पिकांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

➡️ आजच्या तरुण पिढीने शिक्षण घेऊन नोकरी न लागल्याने निराश होऊ नये. वडिलोपार्जित शेतीमध्ये परंपरागत शेती व्यवसाय न करता आधुनिक दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय जर निवडला तर कमी भांडवलातही या व्यवसायात प्रगती करता येते. शिवाय आपण जितके कष्ट जास्त कराल तेवढा पैसाही जास्त प्रमाणात मिळतो. माझे दररोजचे चारशे लिटर दूध असून यासाठी आई नंदाबाई वडील मोहनराव व पत्नी कोमल या कामात मदत करीत असून सर्व काम आम्ही घरचे कुटुंब सांभाळत आहोत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः व्यवसाय करून स्वतःला सिद्ध करावे.अनेक युवक शिक्षण घेऊन बेरोजगार म्हणून फिरत आहेत .नौकरी मिळत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा व्यवसाय सुरू करून जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची तयारी ठेवल्यास नक्कीच यश मिळेल ..

योगेश कर्डिले ,
दूध उत्पादक

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!