आष्टी प्रतिनिधी) आज आष्टी येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व 2024-25 अंतर्गत मंडळ अध्यक्ष निवड विशेष सभा आ.सुरेश अण्णा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख,आष्टी निरीक्षक सर्जेराव तात्या तांदळे,कडा निरीक्षक देवदासजी नागरगोजे,पाटोदा निरीक्षक नवनाथ अण्णा शिरोळे, भाजपा अनु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे,मा.नगरसेवक बाबुराव परळकर यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
231 आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी,पाटोदा,शिरूर,कडा मंडळातील मंडळ अध्यक्ष निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सविस्तर चर्चेनंतर प्रत्येक मंडळातून सर्वानुमते तीन नावे सुचवण्यात आली. यामध्ये आष्टी मंडळासाठी खंडू दादा जाधव, बंडू मामा देशमुख, प्रवीण कदम,
कडा मंडळासाठी अनिल ढोबळे,संदीप खकाळ,रमेश गावडे या इच्छुकांची नावे पुढील कार्यवाहीस्तव भाजपा प्रदेश कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आली.
भाजपा संघटन पर्व अंतर्गत मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रिया या संदर्भामध्ये बैठक घेऊन संवाद साधला तसेच विविध विषयांवर चर्चा केली.