spot_img
spot_img

श्रध्दा, उत्सव, परंपरा, संस्कृतीचा संगम आणि एकात्मतेचे प्रतिक म्हणजे देऊळगाव घाटची कालभैरवनाथ यात्रा

देऊळगाव घाट(प्रतिनिधी)नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर बालाघाटच्या कुशीत वसलेले एक टुमदार गाव देऊळगाव घाट.. नावाप्रमाणे गावात खुप मंदिरे.. ते ही लोकसहभागातून.. श्रध्दा आणि भाव भक्ती चा मेळ साधत शेकडो वर्षांपासून सुख, समृद्धी चा अनुभव घेत कलावंतांची कदर आणि साधुसंतांचा आदर करणाऱ्या देऊळगाव घाट मधील यात्रेच्या पाश्र्वभूमीवर आमचे प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे यांनी घेतलेला यात्रेचा व गावाचा आढावा…

*देऊळगाव घाट च्या कालभैरवनाथाची यात्रा म्हणजे देऊळगाव पंचक्रोशी साठी एक पर्वणीच..!*

गावची यात्रा: एक सांस्कृतिक आणि सामाजिक मेळावा

देऊळगावातील यात्रा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, ती एक सांस्कृतिक आणि सामाजिक मेळावा आहे, जिथे सर्व गावकरी एकत्र येतात, आनंदित होतात आणि आपल्या परंपरा जपतात. यात्रेच्या निमित्ताने, गाव एक वेगळ्या रंगात रेंगाळते, जिथे प्रत्येकजण उत्साहाने सहभागी होतो.
यात्रेचा मुख्य दिवस जरी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती चा असला तरी यात्रेची खरी सुरवात रामनवमी रामजन्म सोहळ्याने होते. चैत्र शुद्ध दशमी व एकादशी ला नाथांच्या कावडी गंगाजल आणण्यासाठी गोदावरी तिर्थ पैठणकडे प्रस्तान करतात. साधारण दिडशे किमी चे अंतर एवढ्या कडक उन्हाळ्यात भाविक आणवाणी पायाने कावड घेऊन सर करतात हे या यात्रेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
चैत्र पौर्णिमेला भल्या पहाटे हनुमान जयंती चा भव्य दिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो. नंतर सकाळी आठ ते दहा आकरा वाजेपर्यंत नेत्रदीपक कावडी मिरवणूक सोहळा साजरा होतो. नंतर कावडीधारक गंगाजलाने श्रींच्या मुर्तीवर व गावातील सर्व देवतांना गंगाजलाभिषेक करतात. यावेळी गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती शेरणी वाटतात. काहीच्या नवसाची शेरणी वाटप असते. या दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी नाथांचे भव्य निशाण मिरवणूक काढली जाते. गावाबाहेरील बारवेजवळ निशाणास जलाभिषेक केला जातो. निशाणावर भागवत धर्माचे भव्य नवीन निशाण चढवले जाते. संध्याकाळी सर्व शेतकरी “भराड” उत्सव साजरा करतात.
यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे “छबिना मिरवणूक”. रात्री नऊ एक वाजेपर्यंत नाथांची पालखी मिरवणूक असते. यावेळी गावातील प्रत्येक समाजघटकाला मानाचे स्थान असते. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. छबिन्या समोर पारंपरिक कला सादर केल्या जातात. लेझीम संस्कृती आता कालबाह्य होत चालली आहे. परंतु पारंपरिक लेझीम पाहायचा असेल तर या यात्रेला नक्कीच भेट द्यावी. बारा वाजता छबिना मिरवणी हनुमान मंदिराच्या जवळ येतें. यावेळी नाथांना तोफांची सलामी दिली जाते. यावेळी केलेली फटाक्यांची आतिषबाजी पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेते.
दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी चा कार्यक्रम होतो. यावेळी प्रत्येक कलावंत आपली कला सादर करतो. प्रत्येक कलेचा आदर करत त्यांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. देऊळगाव घाट मध्ये कायमच कलेला आश्रय दिला जातो. सायंकाळी शिवतीर्थ मैदानावरील नाथ स्टेडियमवर कुस्त्यांचा जंगी हंगामा पार पडतो व यात्रेची सांगता होते. आशा या यात्रेचा मनमुराद आनंद पंचक्रोशीतील नाथभक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटीकडुन करण्यात आले आहे.

➡️ सामाजिक संबंध दृढ होतात*

आमची यात्रा महाराष्ट्र भर कामासाठी गेलेल्या गावातील लोकांना एकत्र आणते, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. गावकरी एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात आणि जुने संबंध अधिक घनिष्ठ करतात. मी यात्रेची वाटच पाहत असतो.
-नाथभक्त बापूसाहेब मुनोत, पूणे.

➡️ यात्रा आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि रूढी जतन करण्यास मदत करते.यात्रा लोकांना एकत्र आणते, ज्यामुळे एकतेची भावना वाढते आणि सहकार्याची प्रेरणा मिळते.
यात्रा लोकांना आनंद आणि उत्साहाने भरून टाकते, ज्यामुळे ते जीवनात नवीन ऊर्जा मिळवतात.
-देशभक्त दादासाहेब ठोंबरे मेजर

*यात्रेच्या निमित्ताने गावची ओळख….*

*गौरवशाली वाससा असलेले जुने देऊळगाव-*
देऊळगाव घाट हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले खेडेगाव आहे. शिवकाळात निशामशाही व आदिलशाही च्या सरहद्दीवर असलेले हे गाव होते. गावाला भव्य प्रवेशद्वार होते. गावात एक पेठ होती. गावच्या गरजा गावातच पूर्ण होत होत्या. बारा बलुतेदार आपापली कामे करत, शेतकरी कष्ट करून शेती पिकवत. त्याकाळी खऱ्या अर्थाने गाव स्वयंपूर्ण होते. तेव्हापासून ते आजपर्यंत मंदिरात अखंड नंदादीप तेवत आहे. त्याच काळापासून हि यात्रेची परंपरा चालत आलेली आहे.

*एकविसाव्या शतकातील देऊळगाव-*
एकविसाव्या शतकात देऊळगावाने सर्वच क्षेत्रांत उंची गाठलेली आहे. गावात शिक्षणाची सोय झाली. गावात शिक्षण संस्था आल्या. कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालयात निर्माण झाले. जि.प.प्राथमिक शाळा, श्री ज्ञानेश्वर विद्यालय, बा.बा. दानवे शैक्षणिक संकुल यांनी गावच्या वैभवात भर टाकली. मुले, मुली मोफत शिकू लागले. शिक्षक, आर्मी,नेव्ही, पोलीस, तलाठी , विविध अधिकारी म्हणून भारत,महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इथले भूमीपूत्र सेवा बजावत आहेत. नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य याच मातीत निर्माण झाले. राजकारणात हि या गावाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. दौलावडगाव गटाचे जि.प. सदस्य याच गावचे भूमीपूत्र…

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!