आष्टी(प्रतिनिधी) आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम हे गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, शासकीय व प्रसिद्धी पासून कोसो दूर असलेल्या वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करत आहेत व दैनिक लोकमत, मराठवाडा साथी या वृत्तपत्र आणि आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक जोपासना करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अविनाश कदम यांच्या कामाची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली असून पुन्हा बीड जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे यांनी बीड येथे ८ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत सत्कार करून व नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. अविनाश कदम यांच्या निवडीबद्दल युवा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष निसार शेख,सचिव जावेद पठाण,कार्याध्यक्ष अक्षय विधाते, कार्यवाहक गहिनीनाथ पाचबैल,अतुल जवणे, संघटक समीर शेख, प्रेम पवळ, सहसचिव संतोष नागरगोजे,विधी सल्लागार ॲड किशोर निकाळजे,संपादक बबलू सय्यद, जेष्ठ पत्रकार बा म पवार, संतोष दाणी,राजेंद्र लाड, जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, संतोष तांगडे, सोपान पगारे, मारूती संत्रे,आदिनाथ ठोंबरे, शिक्षक अनिल बेदरे,किरण शिनगिरे, विजय राजपुरे, महिला पत्रकार प्रिया पवळ, सुरेश मोरे, विपुल सदाफुले यांच्यासह बीड,आष्टी, पाटोदा, शिरूर, अंबाजोगाई, गेवराई, परळी, धारूर, वडवणी तालुक्यातील पत्रकार बांधवांसह, राजकीय, सामाजिक, धार्मिक,मित्र परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.