spot_img
spot_img

राजेंद्र टाक यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर

अहिल्या नगर(प्रतिनिधी)- शहरातील सुविख्यात गायक निवेदक राजेंद्र टाक यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन कडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार २०२५ नुकताच जाहीर झाला आहे.
आपल्या वैविध्यपूर्ण गायनशैली आणि निवेदनाने महाराष्ट्र भर ख्याती प्राप्त केलेल्या श्री. टाक यांनी गेल्या ३५ वर्षात ५००० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. १० पेक्षा अधिक गायकांच्या आवाजात गाण्याची त्यांची खास शैली नगरकरांना खूप भावली. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या पहिल्या ऑडिओ कॅसेटची निर्मिती त्यांनी केली. श्रीक्षेत्र शिंगणापूर, देवगड, मोहटा, गोरक्षनाथगड या आणि अशा अनेक कॅसेट्स मधून गायक, गीतकार,संगीतकार, कथा प्रवक्ता अशा भुमिका त्यांनी निभावल्या आहेत.
गायन निवेदन क्षेत्रातील नवोदितांकरिता स्पर्धा – कार्यशाळांचे आयोजन ते करत असतात. आकाशवाणी, वृत्तवाहिनीवरूनही त्यांनी काम केले आहे. राज्य आणि देशातील सर्वोच्च पदावरील मान्यवरांच्या सभांमधून त्यांनी प्रासंगिक गीतांच्या गायनासह सूत्रसंचालन केले आहे.सामाजिकतेचे भान राखत अध्यातमिक क्षेत्रातही ते भरीव कार्य करत आहेत. मनोरंजनासोबतच प्रेरणादायी, प्रबोधनात्मक, अध्यात्मिक, माहितीप्रद अशा कार्यक्रमांची निर्मिती, कथा व्याख्यान, प्रवचन आदीच्या माध्यमातून केलेले काम यामुळे ते कलाक्षेत्रात आदर्शवत असे व्यक्तिमत्व ठरले आहेत. जिल्ह्यात आणि राज्यभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना यापूर्वीही गौरविण्यात आले आहे .राज्यशासनाने ही त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते लवकरच त्यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!