चिचोंडी पाटील(प्रतिनिधी)येथे सुरू असलेल्या सोनवणेज ज्ञानदीप कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी NMMS स्कॉलरशिप परीक्षेत उज्वल असे यश संपादन केले आहे २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा अर्थातच एन एम एम एस या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली होती या क्लासेसच्या माध्यमातून तब्बल ५ मुलांना एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षेत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळनार आहे तर ११ विद्यार्थ्यांना सारथी स्कॉलरशिप मिळनार आहे.यासाठी सोनवणे सरांनी खूप मेहनत घेतली पहाटेचे ऑनलाईन क्लास, शनिवार रविवार दिवसभर क्लास आणि टेस्ट सिरीज यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे असे क्लासचे संचालक सोनवणे सर यांनी सांगितले या परीक्षेत दशमी गव्हानची कु. जानवी शिवाजी काळे चिचोंडी पाटील येथील श्रद्धा परमेश्वर खांदवे यशदीप ज्ञानेश्वर मांढरे तसेच पिंपळा शाखेतील श्रावणी रोहिदास सोनवणे ,अमित कृष्णा कौसे यांनी यश मिळवले आहे त्याचबरोबर सारथी स्कॉलरशिप मिळवणारे विद्यार्थी भाग्यश्री संतोष भोस, यशराज बाळासाहेब पवार ,शुभम माणिक ठोंबरे ,शिवम बाळासाहेब ठोंबरे, आदिती रवींद्र काळे, आदित्य नवनाथ कोकाटे, आदित्य काळे , कावेरी राजु तनपुरे, अथर्व भागवत चौधरी,तनुजा दत्तात्रय काकडे यांनी प्रत्येकी ३८ हजार रुपये स्कॉलरशिप मिळविली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.एकूण 6,62,400 रुपयांची शिष्यवृत्ती क्लासेस च्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सोनवणेज ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन क्लासचे संचालक सोनवणे सर यांनी केले आहे.