spot_img
spot_img

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणातून मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता – आ.सुरेशधस यांचा गंभीर आरोप

आष्टी (प्रतिनिधी) सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या प्रकरणातून माझी राजकीय कारकीर्द धोक्यात आणून प्रसंगी हरणाच्या शिकारी बाबत विपरीस्थ वक्तव्य करून विष्णूई समाजाच्या समोर मला विलन ठरवून माझ्या कोणाचा कट रचण्यात आला होता असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे
आष्टी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते
बीड जिल्ह्यातील काही बिनकामी जनमानसातून बाद झालेले पुढारी एकत्रित येऊन माझ्या बदनामीसाठी प्रयत्न करत होते त्यातच सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कारवाईमुळे चर्चा सुरू झाली आणि माझ्या बदनामीचा आणि त्यातून माझ्या हत्येचा कट सचण्यात आला कारण काळवीट आणि हरियाण हे वैष्णवी समाजाचे दैवत समजले जाते या हरणाच्या शिकारी बाबत सतीश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काही महाभागांनी
सतीश भोसले हा आदिवासी समाजातील असून हरिणाची शिकार करून सुरेश धस यांना पुरवतो, असे बिष्णोई समाजाला सांगण्यात आले होते त्यातून बिश्नोई समाजा समोर मला विलन ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून माझा खून करण्यासाठी या समाजातील काही व्यक्तींना राजस्थानवरून विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. मला मारण्यासाठीच मुंबईत आणले असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
आष्टी येथील औव्दैतचंद्र निवासस्थानी मंगळवार (दि.१)रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.धस बोलत होते.यावेळी ते पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरले होते.या संपूर्ण प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे.या सर्व घटनांदरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांवर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सतीश भोसलेला अटक देखील करण्यात आली.सतीश भोसले हा हरिणाची शिकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या माध्यमातून आपल्याला जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या माध्यमातून सुरेश धस हे हरणांचे मांस खात असल्याचे पसरवण्यात आले.बिष्णोई समाजाला सुरेश धस यांना हरणाचे मास कसे पुरवले जात होते, हे पटवून सांगण्यात येत होते असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले, इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण बीडमध्ये जे सुरू आहे ते योग्य नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांना इथल्या खाचा-खोचा माहिती नाहीत. त्या काही पण बोलतात.खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत..अरे कशाचे अडचणीत? माझा काय संबंध त्याच्याशी? तो त्याचा शिक्षा भोगत आहे.त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही परळीचा राजकारणात बाद ठरलेले बिनकामी पुढारी आष्टी मतदार संघात बोलवून त्यांच्या तोंडून माझी बदनामी करण्याचे षडयंत्र देखील रचण्यात आले होते या सर्व प्रकरणाचे योग्य वेळी योग्य ठिकाणी मी पुरावे सादर करीन आणि याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांकडे रीतसर तक्रार करणार आहे असेही ते शेवटी म्हणाले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!