कडा प्रतिनिधी:-राज्यात सत्तेसाठी कोणी कोणाबरोबरही जात आहे. राज्यात राजकीय स्थिरतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. सामान्य जनतेसाठी मी मैदानात उतरेल. मागील निवडणुकीत मी पराभूत झाले. मात्र, आता मी निवडणुकीत पडणार नाही तर पाडणार आहे. चारित्र्यहीन, शेतकरी विरोधी, बेरोजगारी कमी करण्यात अपयशी ठरणाऱ्यांच्या विरोधात काम करणार, असे सूचक वक्तव्य भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथील दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसऱ्या मेळाव्याला मी तोंड दाखवणार नाही, मी नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. तुम्ही पैसे जमा केले, तेव्हा मला कळाले की, बँकांची नाही, तर तुमची कर्जदार आहे. मुंडे साहेबांना जाऊन दहा वर्ष झाले सरकारला अजूनही त्यांचे स्मारक बांधता आले नाही आता बांधू नका असा सरकारवर हल्ला चढवत पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून आपले मन मोकळे केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मंगळवार दि. २४ रोजी पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. विशेष म्हणजे सध्या ऑक्टोबर हिटच्या उन्हात बसून भाषण ऐकणाऱ्या समर्थकांशी पंकजा मुंडे या देखील छत नसलेल्या व्यासपीठावरून उन्हातूनच संवाद साधला आहे. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की,राजकारणात कधी-कधी नेते पडतात, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी लोकांची माफी मागितली. काहींना पद प्रतिष्ठा मिळते, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पाथर्डी मतदार संघ मी माझाच मानते, मोनिका राजळे यांना पाहून पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले. मात्र, या मतदार संघाचे नाव घेताच त्यांनाच हसू आले. यामुळे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले . मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझ्या कारखान्यासाठी लोकांनी दोन दिवसात 11 कोटी रुपये जमा केले आहे. मात्र, मी मुलाला सांगितले, मी या लोकांचे पैसे नाही तर त्यांची आर्शीवाद घेणार आहे. तसेच मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच माझ्या शिवशक्ती परीक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही.आता राज्यातील शेतकऱ्यांना, मजूरांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. राज्यात ऊसतोड कामगारांना न्याय देणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.माझ्या आयुष्यातील एखादी निवडणूक जरी मी हरले असेल, पण नागरिकांच्या नजरेतून मी कधीही पडले नाही. जनतेच्या नजरेतून पडेल, असे कोणतेही काम मी केले नाही.या सभेला सर्व जाती-धर्माचे लोक आले असल्याचा दावा देखील पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच सभेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले आहेत. मी असे तुम्हाला काय दिले आहे? ज्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आहात, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित नागरिकांना केला. शेवटीपंकजा मुंडे यांनी जनतेला नतमस्तक होऊन नमस्कार केला, तसेच विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.