देवळाली (वार्ताहार)कडा तालुका आष्टी येथील मातोश्री हॉस्पिटल येथे सद्भावना मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले या उद्घाटनास ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल महानंद दूध संघाच्या संचलित प्राजक्ताताई सुरेश धस कडा गावचे सरपंच युवराज पाटील डी फार्मसी चे प्राचार्य अशोक गदादे सर ज्येष्ठ नागरिक बाबुशेठ भंडारी माजी उपसरपंच राजा बापू कर्डिले गांधी नर्सिंग स्कूलचे संचालक डॉक्टर उमेश गांधी प्रसिद्ध उद्योजक जयंत देशमुख पत्रकार रघुनाथ कर्डिले, बा म पवार, राजेंद्र जैन, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले
याप्रसंगी डॉ अनिल मुरडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिवस-रात्र 24 तास सेवा देणारे सद्भावना मेडिकल गरजू ज्येष्ठ नागरिक महिला रुग्णांना इमर्जन्सी होम डिलिव्हरी घरपोच औषध सेवा जनरिक औषधावरती वीस टक्के सवलत केमिकल फ्री सौंदर्यप्रसाधने आयुर्वेदिक होमिओपॅथिक हरबल सर्व प्रकारचे औषधे साठी दिवस रात्र सेवा पुरवणार असल्याचे सांगितले
याप्रसंगी युवराज पाटील बाबू शेठ भंडारी अशोक गदादे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तर प्राजक्ता धस यांनी डॉक्टर अनिल मुरडे हे नेहमी समाजसेवेतून आरोग्य सेवा करत आलेले आहेत मी त्यांना खूप जवळून ओळखत आहे कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांना व्यक्तींना मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे त्यांचे मातोश्री हॉस्पिटल आणि सद्भावना मेडिकल या आरोग्य सेवेच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी उद्घाटनाचा समारोप करताना ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल म्हणाले की आज जेष्ठ नागरिकांनी महिला यांना घरपोच औषधाची सुविधा दिल्याने एक वेगळाच आनंद आहे कारण आज काही कुटुंबामध्ये अनेक वृद्ध माता-पित्यांना दवाखाना किंवा मेडिकल मध्ये येणे जाणे मुश्किल असते त्यामुळे माता पित्याची सेवा केल्याचे पुण्य कर्म सद्भावना मेडिकल व जनरल स्टोअरच्या डॉक्टर माधुरी मुरडे श्रीराम सावंत गुलरेज शेख मसूद तांबोळी मोहसीन पठाण सर्व सदस्यांना मिळेल असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाम पवार तर आभार प्रदर्शन डॉ.अनिल मुरडे यांनी मानले