आष्टी (प्रतिनिधी) आज पर्यंत पुरुष पत्रकार म्हणून आष्टी तालुक्यात भरपूर पत्रकार कार्यरत आहेत व पत्रकार काम करतात परंतु आष्टी तालुक्यात प्रिया सोन्याबापु पवळ ही पहिली पत्रकार होण्याचा मान तिने मिळवला आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथीलही प्रिया पवळ प्रिया पवळ दैनिक पुढारीचे पत्रकार कवी प्रेम पवळ यांची ती बहीण तसं पाहिलं तर पवळ या घराण्याला पत्रकारितेचा वारसा आहे. प्रिया पवळ तिचे शिक्षण बीसीए सेकंड ईयर झाले असून तिला शैक्षणिक काळातच सामाजिक राजकीय लिखाणाचा छंद तिने जोपासला आणि आपणही पत्रकार आहोत अशी इच्छा तिच्या मनात सारखीच होती अखेर तिने तिची इच्छा पूर्ण केली दैनिक टाइम्स (माजलगाव ) या अग्रगण्य दैनिकांनी तिला आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून घोषित केले. पहिलीच महिला पत्रकार झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होऊ लागला आहे.ग्रामीण भागातील एक तरूणी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करत असल्याने भविष्यात नक्कीच गावासह जिल्हय़ाचे नावलौकिक करील यात तीळमात्र शंका नसल्याचे दिसुन येत आहे.