spot_img
spot_img

राजे मल्हारराव होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बीड येथे धनगर समाज वधु-वर परिचय मेळावा संपन्न – प्रा.भगवान माने

बीड(प्रतिनिधी) :- राजे मल्हारराव होळकर सा.प्रतिष्ठाणच्या वतीने दि.16 मार्च 2025 रोजी वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन मा.डॉ.प्रा.यशपाल भिंगे, मौर्य प्रतिष्ठाण नांदेड, सह प्रा.सर्जेराव काळे मा.जिल्हाध्यक्ष (कॉ.आय), मा.हनुमंत काळे मा.कृषीअधिकारी, मा.मनोहर पिसाळ उद्योजक, मा.शारदाताई पांढरे जालना, मा.शिवाजीराव राऊत मा.जि.प.अध्यक्ष, मा.पोले रामचंद्र नि.मुख्य वनरक्षक, मा.गावडे अशोक, मा.मतकर आण्णासाहेब रासप जिल्हाध्यक्ष, डॉ.अर्जुन मासाळ प्राचार्य अहिल्यादेवी बीएड कॉलेज गढी, ह.भ.प.निर्मळ रामदास, मा.लासुने सर, शेंडगे देवीदास, प्रा.भगवान माने कार्याध्यक्ष राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठाण, मा.अंकुशराव येळे, अध्यक्ष राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठाण, अ‍ॅड.राजू शिंदे सचिव, मा.हनुमंत काळे अर्थ व नियोजन समिती न.प.पाटोदा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात करतांना होळकर शाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांची 332 वी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.यशपाल भिंगे यांनी पोटशाखा सोडून फक्त धनगर शब्द वापरून येथून पुढे एकत्र येण्याचे आवाहन केेले. यावेळी आयोजन समितीकडून भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या मेळाव्यात वधुवराच्या मुलाखती, संवाद चर्चा सत्र संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.कोरडे ताई, पो.अनिल शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.राजेंद्र गाडेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून वधु-वर, पालक उपस्थित होते. कार्यक्रम योग्य नियेाजन केल्याबद्दल पालकांनी नियोजन समितीचे आभार व्यक्त केले. यावेळी आयोजन समितीचे प्रा.भास्कर चादर, विशाल देवकते, सौदलकर बापु, शहादेव धापसे, प्रकाश देशमुख, अ‍ॅड.सचिन कोळेकर, गडदे सर, माणिक अनुसे, प्रतिक माने, अजित माने, अभिषेक शिंदे यांच्यासह समाज बांधवाच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!