spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला मराठा समाजाचा वाढता पाठिंबा

पाथर्डी प्रतिनिधी:- मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापु लागला असुन मनोज जरांगे यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातुन मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळु लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ,वैजुबाभुळगाव व तोंडोळी गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढा-याला प्रवेश बंदी करण्याचा निर्णय गावातील युवक व नागरीकांनी घेतला आहे. गावात सभा घेवुन व जाहीरपणे फलक लावुन ही बंदी सार्वजनिक करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला आहे.
मोहोज देवढे गावात आदिनाथ देवढे, गोरक्ष देवढे,जय देवढे, संभाजी वाकचौरे, अमित देवढे, शिवाजीबापु देवढे, बाळासाहेब सावंत, अशोक काटे, बाळासाहेब काटे यांच्यासह ग्रामस्थांनी गावात सभा घेतली. युवकांनी मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावात कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी येणार नाही. सर्वच पक्षाला सत्ता मिळालेली आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुचराई केली आहे. सरकारचा निषेध करीत विविध पक्षाच्या नेत्यांचाही निषेध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. तोंडोळी येथील युवकांनीही गावात राजकीय पुढा-यांना बंदी असल्याचे जाहीर केले आहे. वैजुबाभुळगाव येथेही पुढा-यांना गावबंदी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तीव्र होणार असल्याची ही नांदी आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!