आष्टी (प्रतिनिधी) कै.माणिक दत्तू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली जयदत्त पानपोई भागवते शेकडो वाटसरूंची तहान. ही जयदत्त पानपोई देऊळगाव घाट व शेडाळा गावाच्या मध्यावर्ती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथ भक्त, हे याच रोड नी मच्छिंद्रनाथ गडाकडे जात असतात, त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात या जयदत्त पानपोई चा नाथ भक्तांना आधार होतो. या पानपोई वरती दररोज शेकडो वाटसरू पाणी पिण्यासाठी थांबत असतात.
हि जयदत्त पानपोई आपल्या वडिलांच्या म्हणजेच कैलासवासी माणिक दत्त ठोंबरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आदिनाथ ठोंबरे यांनी उभारल उभारलेली आहे. या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या जयदत्त पानपोई चे हे तिसरी वर्ष आहे. या रखरखत्या उन्हामध्ये हि पाणपोई येणाऱ्या जाणाऱ्याचे कित्येकांची तहान भागवते. त्यामुळे सर्वत्र आदिनाथ ठोंबरे यांचे कौतुक होत आहे.
➡️ आज आम्ही सहकुटुंब मच्छिंद्रनाथ गडाकडे जात असताना, पाणी पिण्यासाठी याच जयदत्त पानपोई वरती थांबलो होतो. आम्ही भर उन्हामध्ये पाणी पिऊन तृप्त झालो.
… पुणे…शीतल कोठुळे..