spot_img
spot_img

रविवारी आष्टी येथे मराठा वधु वर मेळावा

आष्टी (प्रतिनिधी) ः मराठा सेवा संघ आष्टी तालुका यांच्या मार्गदर्शनातून सगेसोयरे वधू-वर सेवा केंद्राच्या वतीने आष्टी जिल्हा बीड येथे मराठा समाज वधु-वरांसाठी रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय,खडकत रोड, आष्टी जि.बीड येथे मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मराठा समाजातील विवाहइच्छुक वधु-वरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्रांचे हरीभाऊ जगताप पाटील, मुख्य ग्रुप अ‍ॅडमिन शिवाजीराव निकम, किसनराव वाळेकर, बाळासाहेब गायकवाड व मराठा सेवा संघाच्या कार्यकारिणी मंडळाने केले आहे. या महामेळाव्यात मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष उद्योजक शिवश्री, इंजि, तानाजी (बापु) जंजिरे ,मराठा वधु-वर सुचक कक्षाचे , जेष्ठ पत्रकार सीताराम पोकळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्राचार्य शशिकांत कन्हेरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवमती सुवर्णाताई गिर्हे, प्रा. डाॅ. बाबासाहेब मुटकूळे,मारुतीराव तिपाले,हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,
मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी इच्छित स्थळ मिळत नसल्याने अविवाहित आहेत. वराची किंवा वधूची माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करणार आहे. त्याचे पहिले पाऊल या वधूवर महामेळाव्याने उचलले आहे. अनेक पालकांनी मराठा समाजाकडे वधूवर मेळावा घेण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहाखातर या मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुक वधू-वर किंवा त्यांच्या पालकांनी नावनोंदणी सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्रांचे हरीभाऊ जगताप यांच्याकडे करावी, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!