spot_img
spot_img

वाहिरा येथील जि. प. प्रा.शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

आष्टी – (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील जि. प. प्रा. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम १० मार्च रोजी उत्साहात पार पडला, वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात संत शिरोमणी शेख महमद महाराज यांच्या आरतिने झाली . इंग्रजी-मराठी एकांकिका, गीतगायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते, देशभक्तिपर गीते, शेतकरी गीते, लावणी, रीमिक्स गाणे, नाटिका, छत्रपती शिवाजी महाराजांची गीते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत, इत्यादी गीत प्रकार विद्यार्थ्यांनी जल्लोषात सादर केली.

“वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही, तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा चांगला उपयोग होतो,” असे मत लंबाते यांनी या वेळी व्यक्त केले.

याप्रसंगी – वाहिरा गावचे सरपंच उपसरपंच, सेवा सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत मेंबर, व विविध क्षेत्रातील अधिकारी मान्यवर, पंचक्रोशीतून बहुसंख्य समाज उपस्थित होता
यावेळी या स्नेहसंमेलनाला, तो त्यांनी अनमोल असा, बक्षिसांचा वर्षाव केला, व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदाचे भरभरून कौतुक केले, त्या सर्व शिक्षकांनी मिळून, अतिशय सुंदर, मेहनतीने, सुंदर कार्यक्रम बसवला होता,
या कार्यक्रमात, विद्यार्थ्यांच कौतुक म्हणून एक लाख 80 हजार रुपयांच बक्षीस जमा झाले..

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!