spot_img
spot_img

नाफेड शासकीय हमीभावाने तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू – सभापती रमजान तांबोळी

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मतदार संघाचे लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे शासकीय तुर खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली असून सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून ऑनलाईन नोंदणी दि.२४ मार्च पर्यंत करून घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.७५५० प्रति क्विंटल दराने तुर खरेदी केली जाणार आहे.
आष्टी मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत  नाफेड अंतर्गत दि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांचे सेवा सहकारी सोसायटी लि. जामगाव ता.आष्टी या शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्रांस मंजुरी मिळाली आहे. या हमीभाव केंद्रात ७५५० प्रति क्विंटल दराने तुर खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी सातबारा व ८ अ मूळ प्रत,आधारकार्ड,बँक पासबुक (चालु खाते द्यावे,जनधन खाते देऊ नये),ऑनलाइन पिकपेरा नोंद असणे आवश्यक इत्यादी कागदपत्रासह प्रत्यक्ष येऊन नोंदणी करण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.तसेच लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार असून शेतकऱ्यांनी कमी दराने तुरीची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!