पाथर्डी प्रतिनिधी:- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विजयादशमीच्या निमित्ताने पाथर्डी शहरातील हिंदू रक्षा युवा मंच व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी युवकांनी दुर्गामाता दौड चे आयोजन केले होते.
सकाळी प.पू.माधवबाबा यांच्या हस्ते ध्वजपूजन करुन संत वामनभाऊनगर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून या दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. हे संचलन शेवगाव रोड, नाईक चौक, अजंठा चौक, नवी पेठ, जय भवानी चौक, सुतार गल्ली, कसबा वेस, ब्राम्हण गल्ली, मार्गे गाडगे आमराई येथील तुळजाभवानी मंदिरात शस्त्रपूजन, ध्येयमंत्र व प्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या संचलनाच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी माता भगिनींनी सडा रांगोळी काढून औक्षण केले.
या उपक्रमाविषयी बोलताना सचिन नागपुरे म्हणाले की, आम्हाला वासनेपासून व्यसनापासून, आळसापासून, स्वार्थापासून, राजकारणापासून, लाचारीपासून, पाश्चिमात्य संस्कृतीपासून मुक्ती दे. हे मागण मागण्यासाठी मागील नऊ दिवसा पासून नवरात्रीमध्ये दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान या संघटनेचे संस्थापक प.पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शना ने दुर्गामाता दौड काढण्यात आली, या संचलनात सर्व युवक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या संचालनात युवती व महिला भगिनींनी ही मोठा सहभाग घेतला होता.
यावेळी शिवव्याख्याते सचिन नागापुरे, चैतन्य वेदपाठक, शंकर पालवे, अविनाश पवार, प्रथमेश पंडित, चैतन्य पवार, राहूल टेके, प्रसाद सरोदे, चैतन्य सुडके, राहूल तरटे, भारतीताई आसलकर, ज्योती शर्मा, भाऊ तुपे, प्रतिक दिक्षीत, गौरव वेदपाठक,अभिषेक खटावकर, प्रसाद जातेगावकर, ऋषी कोकाटे, सोमनाथ दुधाने, सुरेश पालवे, अमोल केळकर, रमेश बोरुडे यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.