आष्टी (प्रतिनिधी)- तालुक्यातील केरुळ येथील रहिवासी व कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्रा डॉ सय्यद जमीर शब्बीर यांची 18 मार्च ते 24 मार्च 2025 या दरम्यान गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या पहिल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. नुकतेच निवडीचे पत्र भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर सिंग व अध्यक्ष अधव अर्जुना यांनी दिले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी, ट्रस्ट अध्यक्ष श्री गोकुळदाजी मेहेर, कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, सचिव हेमंत पोखरणा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, संचालक योगेश चानोदिया, संजय मेहेर, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज. मो. भंडारी, प्रशासकीय अधिकारी नवनाथ पडोळे, बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष शिवराज पाटील, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा निसार शेख तसेच क्रीडा सहकारी, क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
➡️ आष्टी तालुक्याची शान व ग्रामीण भागातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे काम प्रा डॉ सय्यद जमीर यांनी केले आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाला बास्केटबॉल सह अनेक खेळात देशात नाव लौकिक मिळवून दिले आहे. तसेच आष्टी तालुक्यातील अनेक खेळाडू घडवले आहेत. त्यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.