spot_img
spot_img

आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान जनजागृती व्याख्यान संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च , आष्टी (डी .फार्म , बी. फार्म आणि एम .फार्म ) या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान जनजागृती शिबिर व्याख्यानाचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये अष्टविनायक ब्लड बँक अहिल्यानगर यांनी सहभाग नोंदवला व रक्त संकलन करण्याचे काम केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी बी राऊत , प्रमुख पाहुणे नेत्रतज्ञ डॉ.चंद्रकांत गोसावी व अष्टविनायक ब्लड बँकेचे व्यवस्थापक श्री संदीप पाटोळे हे होते. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. डी बी राऊत सर यांनी सांगितले की रक्तदान करणे ही एक आपली सामाजिक बांधिलकी आहे तसेच नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना पुन्हा जग पाहता येते या याविषयी मनोगत व्यक्त केले, डॉ.चंद्रकांत गोसावी यांनी नेत्रदानाचे महत्त्व काय आहे नेत्रदान करताना कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात याबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच श्री संदीप पाटोळे यांनी रक्तदान किती महत्त्वाचे आहे एक रक्तदात्यामुळे तीन व्यक्तींना जीवदान मिळते , रक्तामधील असलेले वेगवेगळे घटक कशा पद्धतीने वेगळे केले जातात व कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो याबद्दल सविस्तर माहिती दिली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख श्री बोडखे वैभव व श्री निलेश नालकोल, सर्व सहाय्यक प्राध्यापक यांनी केले होते या कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी सर्व रक्तदात्यांचे व कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!