spot_img
spot_img

पूर्ण सेवेत शिस्त आणि वेळेला फार महत्व दिले – श्रीमती लता भोसले

आष्टा हरिनारायण (प्रतिनिधी) ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांशी एकरूप होण महत्त्वाचे असते कारण विद्यार्थ्यी आणि शिक्षक यांच्यातील गुरू शिष्याचे नाते जर दृढ झाले तर विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानचं मिळत नाही तर त्याच्या जिवनात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाण्याची त्याची तयारी असते आणि त्याचे त्याला जिवणभर फायदा होतो ते प्रमाणीकपणे काम करण्याचा प्रयत्न मी केला असून मी केलेल्या बत्तीस वर्षाच्या सेवेत शिस्त आणि वेळेला फार महत्व दिले असल्याचे मत विवेकानंद शिक्षक सहकारी बँकेच्या आदर्श शिक्षिका लता भोसले यांनी व्यक्त केले.
वडवणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या सहशिक्षका श्रीमती लता भोसले यांचा वयोमानानुसार सेवापुर्ती सोहळा दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी वडवणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा यांच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक फुल पोशाख व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला श्री विठ्ठल नागरगोजे गटविकास अधिकारी पंचायत समिती वडवणी श्री बाबासाहेब उजगरे गटशिक्षण अधिकारी वडवणी श्री शेखर मोहनेरकर सहाय्यक गटविकास अधिकारी वडवणी श्री अर्जुनराव थोरात सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरूर श्री नानाभाऊ हजारे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती वडवणी केंद्रप्रमुख श्री शेख सर सहशिक्षक श्री बडे बी. के. सर श्री बडे इ. के. श्री गवळी सर श्री माने सर श्रीमती मुंडे मॅडम श्रीमती लहाने मॅडम, श्री व सौ ज्योती संतोष थोरात श्री व सौ पूजा सचिन थोरात मुलगी स्वाती प्रदीप गवळे, जावई प्रदीप गवळे, शाळेचे विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. १३/१/१९९३ रोजी आष्टी तालुक्यातील मातकुळी येथून पहिल्यांदा ज्ञानार्जनाच काम सुरु केलेल्या श्रीमती लता भोसले मॅडम यांचे काम अधिक अधिक चांगले केले असून स्त्रीशिक्षण, स्वच्छता मोहीम तसेच जनरल नॉलेज या गोष्टीवर विशेष लक्ष देऊन काम केल्याबद्दल त्यांना कडा येथील विवेकानंद शिक्षक सहकारी बँकेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला तसेच फक्त ज्ञानदानाचेच काम मॅडमनी केले नसुन सामाजिक बांधिलकी जपत समाजसुधारण्यासाठीह उल्लेखनीय कार्य केल्याचे मत श्री विठ्ठल नागरगोजे गटविकास अधिकारी पंचायत समिती वडवणी यांनी व्यक्त केले यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. बाबासाहेब उजगरे, शेखर मोहनेरकर, श्री. अर्जुनराव थोरात, केंद्रीय मुख्याध्यापक, शाळेचे सहशिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रीमती भोसले मॅडम विषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचालन अशोक राठोड यांनी केले तर आभार शाळेचे सहशिक्षक मनोजकुमार गवळी यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!