spot_img
spot_img

*आपट्याच्या पानावर भगवान श्रीरामाचे चित्र रेखाटून दसऱ्याच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा*💐 *भारती विद्यापीठ प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

देवळाली (प्रतिनिधी)दसरा हा सण दहा दिवस मानला जातो. त्यापैकी नऊ दिवस नवरात्रोत्सवाची मनोभावे पूजा केली जाते आणि दहावा दिवस दसरा स्वरूपात साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवीने क्रूर राक्षस महिषासुर याचा वध केला होता आणि याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाला पराजित करून त्याच्यावर विजय मिळवला होता दसऱ्याच्या दिवशी धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन करण्यात येते. याचेच औचित्य साधून भारती विद्यापीठ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शंभर पेक्षा जास्त आपट्याच्या पानावर प्रभू श्रीरामाचे चित्र रंगवून दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत  तीन तासाच्या कालावधीमधे हे चित्र रंगवण्यासाठी  एक्रेलिक रंगाचा वापर केला आहे.
स्वतः कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी याअगोदर जगातील पहिल्यांदा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाकरीवर चित्र रेखाटले आहे .तसेच राजमाता जिजाऊ,डॉ पतंगराव कदम ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपळाच्या पानावर चित्रे काढली आहेत. विद्यार्थ्याना अशा प्रकारची चित्रे कशी रंगवायची याचे प्रात्यक्षिक व माहिती अगोदर दिली होती. पुस्तकाशिवाय विद्यार्थ्यांनी माझी कला आवर्जून आत्मसात करावी असा उद्देश्य कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांचा आहे.
या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजीत कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक श्री एम डी कदम सर, डॉ. विलासराव कदम सर ,प्राचार्य श्री बेल्लम आर टी सर,उपप्राचार्य श्री आर एच् कदम सर ,विद्यालयातील सर्व सेवक व पालकांनी कौतुक  व अभिनंदन केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!