कडा (राजू म्हस्के)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत भैरवनाथ विद्यालयाच्या चार खेळाडू विद्यार्थ्यांनी सहा क्रीडा प्रकारात बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यामधील उंच उडी मध्ये सिल्वर मेडल सह सार्थक अशोक वांढेकर यांनी राज्यस्तरीय निवड निश्चित केली तसेच 80 मीटर अडथळा शर्यत मध्ये ब्रांझ मेडल मिळवले आहे.विद्यालयाचा दुसरा खेळाडू शिवम मल्हारी म्हस्के यांने देखील 5 किलोमीटर चालणे ह्या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल सह राज्य स्तरावर निवड निश्चित केली . आठवी मध्ये शिकत असलेला शिवम हा खेळा बरोबर अभ्यासात सुध्दा खूप हुशार आहे. या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय निवड झाली आहे.आदित्य आजिनाथ कांबळे व विशाल अर्जुन गावडे यांनी देखील विभाग स्तरावर सहभाग घेतला. विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जात आहे.त्यासाठी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जादा तासिकांचे नियोजन केले जात आहे. स्कॉलरशिप, एन.एम.एम.एस , मंथन तसेच दहावी बोर्ड परीक्षा साठी नियमितपणे तयारी करून घेतली जात आहे.खेळ हा आनंदी शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्या मुळे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ती नैसर्गिक गुणवत्ता असल्याने निवडक काही विद्यार्थींचा खेळाच्या तासिके मध्येच एक तास नियमितपणे सराव करून घेतला जातो. या विद्यालयामधून अनेक प्रतिभावंत खेळाडू तयार झाले आहेत.मैदानी स्पर्धेत राज्य स्तरावर सहभाग व मेडल मिळवलेले अनेक खेळाडू विद्यालयात तयार झाले आहेत.राज्य स्तरावर निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.हनुमंतरावजी थोरवे साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.उढाणे परमेश्वर विठोबा तसेच युवा नेते धैर्यशील थोरवे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरावरील स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सरपंच महेश उद्धवराव कराळे,उपसरपंच अर्जुन बागले, माजी सरपंच महादेव डोके, माजी उपसरपंच अशोक दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य शरद कराळे, उमेश डोके,बांदखेल चे सरपंच विशाल झांबरे,खेळाडूंचे पालक व सर्व ग्रामस्थांनी व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेची तयारी विद्यालयातील क्रीडा शिक्षक भागिनाथ दहातोंडे सर हे करून घेत आहेत.