आष्टी (प्रतिनिधि) भारतीय कृषी विमा कं.मार्फत आष्टी तालुक्यातील विविध गावांमध्ये ०१ ते ०७ डिसेंबर दरम्यान वेगवेळे उपक्रम राबविण्यात आले.
पिंप्री आष्टी येथे पीक विमा जनजागृतीच्या अनुषंगाने भारतीय कृषी विमा कं.मार्फत *”फसल बिमा पाठशाळेचे”* आयोजन केले होते. पीक विम्याबाबत जनजागृती करणे गरजेचे असुन हा उपक्रम त्याचाच एक भाग होता. सदरील कार्यक्रम जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पार पडला यावेळी तालुका प्रतिनिधी श्री.विनोद लोंढे आणि श्री.संजय पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.