spot_img
spot_img

रब्बीला बदलत्या वातावरणाचे ग्रहण; थंडी घटली ————————————— उत्पन्न घटण्याची शक्यता,धुकेचा गहू,हरभरा,तूर या पिकांवर परिणाम

आष्टी (प्रतिनिधी):- आष्टी तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे रबी पिकांवर त्याचा परिणाम होतो आहे. पिकांसाठी आवश्यक असलेली थंडी कमी झाल्याने नुकत्याच पेरणी केलेल्या गव्हाची उगवण क्षमता घटली आहे.त्यातच मध्यंतरी पाऊस झाल्याने रबी पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यानी उधार उसणवारी करून लागवड केली.समाधानकारक पावसावर खरीप पिके देखील जोमात होती.माञ ऐन खरीप हंगाम घरात असताना ढगाळ वातावरण धूमाकूळ घालीत खरिपातील पिकाचे वाटोळं केले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा पूर्णतःचुराडा झाला.मात्र शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे खचुन न जाता मोठ्या प्रमाणात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत रब्बीत मका,गहु,हरभरा पिकाची पेरणीकरीत हिरवे स्वप्न उराशी बागळून आपले शेतशिवार फुलविले आहे. माञ आता मागील काही दिवसापासून हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार अचानक ढगाळ वातावरण परिसरात तयार झाले आहे. शिवाय रिमझीम पाऊस देखील सुरू झाला. त्यामुळे याचा मोठा फटका निश्चितच रब्बी पिकावर होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. बर्याच शेतकऱ्यांनी नुकतेच हरभरा पिकाला पाणी दिले होते.त्यात पुन्हा आता पाऊस पडत असल्याने हरभरा पिक जळून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आणखी किती दिवस हे वातावरण राहील याची चिंता शेतकऱ्यांना सताऊ लागली आहे.

➡️ ◆शेती व्यवसाय आला धोक्यात :

शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करुन दोन्ही हंगामात मेहनत घेतो.मात्र नेहमीप्रमाणे अपयशच शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे.उत्पादनकमी आणि खर्च जादा अशी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.दुसरीकडे मजुरीचे दर तसेच शेती साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्या तुलनेत शेती मालाला मात्र नगण्य भाव बाजारात मिळत असल्याने एकूण परिस्थिती पाहता कृषीप्रधान देशात शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.उत्पादनात घट होण्याची भीती उगवण क्षमता चांगली राहावी म्हणून नुकतेच हरभरा पिकाला दुसरे पाणी दिले होते. मात्र आता बदलते वातावरण आणि सोबत पडणारा पाऊस हरभरा पिकाला घातक ठरणार आहे. महागडी बियाणे खरेदी करुन अडीच एकर हरभरा पेरणी केली. मात्र आता हवामान बदलल्याने पुन्हा नवीन संकट आले आहे. त्यामुळे हरभरा उत्पादनात घट होईल अशी शक्यता आहे

– विष्णु तळेकर,शेतकरी,

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!