आष्टी(प्रतिनिधी) राज्यात महायुतीला ऐतिहासिक असा विजय मिळाला आहे.आष्टी विधानसभा मतदारसंघात च्या सर्वांगीण विकासासाठी अठरापगड जातीला सोबत घेऊन गोरगरीब सर्वसामान्यांच्या सुख दुखात धावून जाणारे आमदार सुरेश धस हे विधानसभेच्या चौथ्या टर्म ला ८० हजाराचे मताधिक्य घेऊन मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. विधानपरिषद वरही त्यांनी पाच वर्षे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले असून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी व महिला सुरक्षित राहण्यासाठी मतदारसंघातील शेतकरी सुखावला पाहिजे शाश्वत विकासासाठी तरुणांच्या रोजगारासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे कॅबिनेट मंत्री होणे गरजेचे आहे. यासाठी सुरेश आण्णा धस यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन मतदारसंघाला व मतदार संघातील नागरीकांना न्याय द्यावा अशी मागणी वाळुंज गावचे उपसरपंच बंडू सोले यांनी केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की
आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या गावागावांमध्ये रस्ते, वीज, पाणी देवस्थानचा विकास भक्तनिवास, तरुणांना रोजगाराची संधी, मतदान संघाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासभिमुख नेतृत्व म्हणून सुरेश आण्णा धस यांची ओळख असून आमदार सुरेश धस हे लाडके नेतृत्व असून अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारा हा नेता आहे कोणत्याही परिस्थितीत न डगमगता कायम धाडसी निर्णय घेत आहेत अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. वेळोवेळी पोटतिडकीने त्यांनी सभागृहात मतदार संघाचे प्रश्न मांडले आहेत.कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्रात सर्वात अधिकचे कोविड सेंटर त्यांनी उभारून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्रीपद देखील भुषविले आहे. त्यांच्या अनुभवाचा योग्य तो सन्मान करून त्यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावे त्यांच्या अनुभवाचा आष्टी विधानसभा मतदारसंघात सह संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल गोरगरीब कष्टकरी यांच्या न्यायासाठी आमदार सुरेश धस कॅबिनेट मंत्री होणे गरजेचे असल्याचे उपसरपंच बंडू सोले यांनी सांगितले.