*मुंबई (प्रतिनिधी)आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महापरिनिर्वाण दिनी भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नवी मुंबई शाळेचे कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी पेनाच्या नीपवर अत्यंत लहान अशा दोन सेंटीमीटर बाय सात एम एम या लहानशा आकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्र रेखाटून महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन केले आहे.
यासाठी त्यांना नऊ मिनिटे चोविस सेकंद इतका कमी कालावधी लागला असून हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची नोंद घेतली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या सौ चैताली ,मुलगी सार्थकी, मयुरेश महाडिक, श्री बोबडे रुक्माजी यांची त्यांना अनमोल साथ मिळाली.याअगोदर ज्वारीच्या भाकरीवर, पिंपळाच्या पानावर आणि चार बोटांच्या साह्याने चित्र रेखाटले होते .तसेच ३२२१वह्या पुस्तकाच्या माध्यमातून ५०बाय ८० फुटामध्ये बाबासाहेबांचे कोलाज विद्यार्थ्यांच्या मदतीने साकारले होते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ विश्वजित कदम तथा बाळासाहेब , भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम (वहिनीसाहेब ) श्री एम डी कदम सर , डॉ विलासराव कदम सर,प्राचार्य श्री बेल्लम आर टी , उपप्राचार्य श्री आर एच कदम सर यांनी विशेष कौतुक केले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी एक उत्तम कला जोपासावी अशी इच्छा कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी व्यक्त केली*