आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी देवेंद्रजी फडणवीस यांचा दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याचे आष्टी शहरतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ.सुरेश धस समर्थकांनी मोठ्या स्क्रीन वर दाखविला.त्यानंतर आनंदोत्सव साजरा करत शहर शहर फटाकांच्या अतीषबाजूने आणि घोषणांनी दणाणून सोडले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी आझाद मैदान मुंबई येथे मोठा दिमाखदार शपतविधी सोहळा संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याची आष्टी शहरात देखील जय्यत तयारी भाजपा आ. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या स्क्रीनवर हा शपथविधी सोहळा दाखविण्यात आला.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.त्यानंतर आष्टी शहरातून डीजे वाद्यासह भव्य विजयोत्सव रॅली काढण्यात आली.रॅलीत बाहुबली देवाभाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,भारतीय जनता पार्टीचा विजय असो यासह घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.यावेळी कार्यकर्त्यांनी हातात देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर घेत देवा भाऊ या गीतासह विविध गाण्यांवर ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.