spot_img
spot_img

विठ्ठल महाराजांनी केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी, संत वामनभाऊंच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री

कडा ( प्रतिनिधी ):- संत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील व राज्याचा कारभार करतील अशी भविष्यवाणी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या काल्याच्या किर्तनातून आणि गहिनीनाथ गडावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मिडीयांशी बोलताना केली होती.
आष्टी तालुक्यातील पांगुळ गव्हाण येथे संत वामन भाऊ महाराज यांनी १०० वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला होता हि पंरपरा आजही चालू आहे. पांगुळ गव्हाण येथे ५ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १५ सप्टेंबर रोजी रविवारी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने पांगुळ गव्हाण येथे समारोप झाला. यावेळी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पुढे बोलताना महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे देव,धर्म आणि देशाच्या विकासासाठी प्राधान्य देणारे तसेच हे राज्यातील सर्व समाजाचे कैवारी आहेत, त्यांना वामनभाऊ महाराजांचे आशिर्वाद आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. विठ्ठल महाराजांची भविष्य वाणी सत्यात उतरल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!