आष्टी (प्रतिनिधी) आज निसर्ग व सामजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांची रविवार दिनांक २४/११/२०२४ रोजी ८ वे पर्यावरण संमेलन “२९ डिसेंबर २०२४ रोजी आळंदी देवाची” येथे पार पडणार असून त्याची सहविचार सभा पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे येथे मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रमोददादा मोरे यांच्या उपस्थित पार पडली.या सभेला आळंदी येथे आयोजित “८ वे पर्यावरण संमेलन आळंदी” येथील कार्यक्रमा संदर्भात अध्यक्ष,व्याख्याते,पर्यावरण प्रेमी यांची राहण्याची व्यवस्था,जेवणाची सोय,क्षेत्रभेट,कार्यक्रमाचा हॉल इ.अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच या पर्यावरण संमेलन संदर्भात जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी या संमेलनास आपला सहभाग दर्शवावा,त्यासाठी राज्यातील पर्यावरण प्रेमी यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी या बैठकीमध्ये सुचविले.
या सभेला श्री.धीरज वाटेकर (सचिव),पुणे जिल्हाध्यक्ष श्री.मारुती कदम,श्री.भोजने चंद्रकात(जिल्हा संघटक) इ.पर्यावरण प्रेमी उपस्थित होते