spot_img
spot_img

आष्टी तालुक्यातील जनतेचे प्रेम विसरू शकणार नाही – डॉ नितीन मोरे भविष्यात उच्च पदावर विराजमान होऊन रुग्णांची सेवा करावी – डॉ जयश्री शिंदे

देवळाली (वार्ताहार)

तालुक्यातील जनतेने मला भरभरुन प्रेम दिले, सहकार्य केले. अपुरे संख्या बळ असताना ही आपण सर्वांनी मला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. एक परिवार असल्या प्रमाणे आपण सर्वांनी मदत केली. त्यामुळे माझ्या चार वर्षांच्या काळात आपण केलेल्या सहकार्यामुळे माझ्या हातून रुग्णांची सेवा घडली त्यामुळे मी तालुक्यातील जनतेचे सहकार्य व प्रेम विसरू शकणार नाही असे प्रतिपादन टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोरे यांनी मंगळवार दि. १७ रोजी टाकळसिंग येथे आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले. तर भविष्यात उच्च पदावर विराजमान होऊन गोरगरीब जनतेची रुग्णांची सेवा आपल्या हातून घडावी. ज्याप्रमाणे आपण आष्टी तालुक्यातील जनतेला मनोभावे सेवा दिली अशीच सेवा आपण जेथे जाल तेथे द्यावी असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ जयश्री शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोरे व डॉ प्रसाद वाघ तसेच सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन राऊत यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मंगळवारी टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ जयश्री शिंदे तर पत्रकार निसार शेख, पत्रकार आण्णासाहेब साबळे, सरपंच बलभीम वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ जयश्री शिंदे म्हणाल्या की, डॉ मोरे, डॉ वाघ, डॉ राऊत यांनी तालुक्यातील जनतेला उत्कृष्ठ सेवा दिली. डॉ नितीन मोरे यांनी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करत दिवसातून २५० च्या पुढे ओपिडी करून कडा बरोबरच आष्टी तालुक्याचे संपूर्ण मराठवाड्यात नाव लौकीक मिळवून दिले.

शासनाच्या वतीने पुरस्कार मिळवून दिला. याच उत्कृष्ठ कार्याची पावती म्हणून डॉ नितीन मोरे यांना ऐन कोरोना काळात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती दिली गेली. त्यांनी दिवस रात्र कष्ट घेत संपूर्ण तालुक्यातील जनतेला योग्य न्याय देत उत्कृष्ठ सेवा पुरवली.

याची दखल घेत त्यांना विविध सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळे पाणावले आहे. हे डॉक्टरांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची पावती आहे. आज त्यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून त्यांनी भविष्यात मोठे अधिकारी व्हावे व सर्व सामान्य नागरिकांची सेवा करावी असे सांगितले. यावेळी डॉ मोरे, डॉ वाघ, डॉ राऊत यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!