अहिल्या नगर (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील देडगाव येथील रहिवासी शंकर बाबुराव लाड यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दि.१-११-२०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता तसेच ते लोकांच्या सुखदुःखात ते सतत पुढे असायचे त्यांना आध्यात्माची आवड असल्यामुळे त्यांना थोर साधुसंतांचा सहवास लाभला. अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले महसूल अधिकारी राजेंद्र लाड आणि प्राथमिक शिक्षक संजय कुमार लाड यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने देडगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दशक्रिया विधी रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४रोजी सकाळी नऊ वाजता महादेव मंदिर बालाजी देडगाव तालुका नेवासा येथे होईल आणि तेरावा दिनांक १३-११-२०२४ रोजी घरी होईल.