spot_img
spot_img

साखर कारखाने गळीत हंगाम शुभारंभ परवाना दिनांका मध्ये बदल होण्याची शक्यता… कारखानदार आणि मुकादम यांनी ऊस तोडणी कामगारांना पाठवण्याची घाई करू नये — माजी मंत्री सुरेश धस

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्याच्या क्रशिंग लायसन्स तारखे मध्ये बदल होण्याची शक्यता असल्याची आपली माहिती असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्यामुळे कारखानदार आणि मुकादम यांनी ऊस तोडणी कामगारांना कारखान्यांकडे पाठवण्याची घाई करू नये असे आवाहन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले आहे समाज माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ते पुढे म्हणाले की दिनांक 15 ऑक्टोबर या दिवशी गळीत हंगाम सुरू करणे बाबतचे कृषी लायसन्स ची तारीख नियोजित होती परंतु महाराष्ट्र राज्यातील धुळे नंदुरबार छत्रपती संभाजी नगर जालना परभणी नांदेड आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील बहुतांश ऊस तोडणी कामगारांचा मतदानाचा मूलभूत अधिकार असल्यामुळे ते मतदानाचे पवित्र कार्य असून वंचित राहण्याची शक्यता होती त्यामुळे मतदानाची तारीख असलेल्या 20 ऑक्टोबर नंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री आणि आमदार पंकजाताई साहेब मुंडे यांना आपण याबाबत अवगत केले असून त्यांनी याबाबत सकारात्मक विचार केला असून याबाबत तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे साखर कारखाना व्यवस्थापन आणि ऊस तोडणी कामगार मुकादम वाहतूकदार यांनी ऊस तोडणी कामगारांना साखर कारखान्याकडे पाठवण्याची घाई करू नये असे विनम्र आवाहन आपण करत आहोत असे त्यांनी शेवटी म्हटले आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!