spot_img
spot_img

कृषी महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थ्यांचे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धा २०२४-२५ (कला) मध्ये घवघवीत यश

आष्टी (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव साहित्यिक स्पर्धेचे आयोजन नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आयोजन करण्यात आले होते.श्री.छ.शा.फु.आ.कृषी महाविद्यालय आष्टी येथील विदयार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला होता.
यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव लौकिक केले. कुमार देवकर अभिषेक अजिप याने रांगोळी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, व्यंगचित्र- रौप्य पदक ,स्पॉट पेंटिंग -कांस्य पदक तर पोस्टर सादरीकरण मध्ये चौथा क्रमांक पटकविला.कुमार चव्हाण रोहित हेमंत याने व्यंगचित्र स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले.तर कुमार गीते सुजित तुळशीराम याने व्यंगचित्र स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक पटकविला.
आनंद चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री.भीमरावजी धोंडे साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीचे कौतुक केले.तसेच प्रशासकिय अधिकारी डॉ. डी. बी.राऊत यांनी पण मुलांना शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या विद्यार्थ्यांचं या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत विद्याथ्यर्थ्यांनी सहभागी होऊन यश मिळविण्यासाठी सांस्कृतिक विभागा प्रमुख प्रा. एस. एल. बनकर विद्यार्थी कल्याण विभाग व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!