आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहर झपाटयाने वाढत आहे.
येथे सर्व प्रकारच्या शिक्षणाची सुविधा आमच्या शिक्षण संस्थेने उपलब्ध करुन दिलेली आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणास आलेले आहेत . शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा सीमेवारील हा तालुका व शहर आहे. झपाटयाने वाढणाऱ्या या शहरातील जनतेला पिण्याचे पाणी भरपुर व स्वच्छ मिळण्यासाठी आष्टी शहरराला कायमस्वरुपी पिण्याचे पाण्याची व्यवस्था जायकवाडीतुन झाल्यास आणखी शहराचा विस्तार व प्रगती होईल.भुकन व त्यांचे सहकारी बांधव उभारत असलेले असे आणखी गृहप्रकल्प होतील.आज भुमीपुजन होत असलेल्या या यशोदीप कंन्ट्रक्शन कंपनीनीच्या गृह प्रकल्पाने आष्टीच्या वैभवात भर पडणार असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथे इंजि.बाळासाहेब भुकन,गोकुळ धोंडे ,बाबासाहेब धोंडे व यशोदीप कन्स्ट्रक्शन आणि समृद्धी यश डेव्हलपर्स यांचे द्वारे आष्टी येथे अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त असे १०० सदनिका बांधकामाचे भुमीपुजन व प्लॕट विक्री आॕफीसचा शुभारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानवरुन बोलत होते. यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,माजी आ.भीमराव धोंडे,सरपंच शामभैय्या धस,सौ. सविताताई गोल्हार ,ह.भ.प.राऊतदादा महाराज ,निळकंठ महाराज तावरे,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प. दादा महाराज चांगुणे,दिलीपदादा हंबर्डे,किशोर हंबर्डे,संतोषशेठ मेहेर,संजय मेहेर, व्यापारी असो,अध्यक्ष संपत शेळके यांच्या हस्ते भुमीपुजन झाले. यावेळी आर्किटेक खैरे पाटील (पुणे),रविशेठ ओस्वाल ( व्यापारी असोशिशन पुणे),
शिरीष जाधव (त्रिमुर्ती डेव्हलपर्स पुणे),समीर सय्यद (पुणे बिल्डर), अ.भा.म.फुले समता परिषदेचे नेते प्रितेश गवळी,मिलिंद वालवडकर (पुणे),हसन मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक शैलेंद्र चाटे,विकास हजारे,आर्किटेक मनोहर येरावार, धैर्यशील खैरे पाटील,समाजसेवक विजय गोल्हार,डाॕ. शिवाजी राऊत, आण्णासाहेब चौधरी, सुनिल नाथ, काकासाहेब शिंदे, विठ्ठलराव बन्सोडे, सरपंच सावता ससाणे,अशोक साळवे,विक्रम पोकळे,शंकर देशमुख, पत्रकार उत्तम बोडखे, प्रविण पोकळे, हिवरकर,आमोल भंडारी,रत्नदीप निकाळजे,संजय टेकाडे,आनंदराव बन्सोडे, माजी सरपंच अतुल कोठुळे,इंजि.संदीप घोलप, इंजि.पी.बी. बोडखे,रविशेठ अग्रवाल, टाऊन प्लॕन आॕफीसर डोंगरे,मनोज धस,सुनिल मेहेर, नवीन कासवा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,अहिल्यानगर ते बीड यादरम्यान सात मजली टॉवर्स येथे उभारण्यात येणार आहे. अंत्यंत गरीब कुंटुबातुन इंजि.बाळासाहेब भुकन आलेले आहेत. कष्टाने त्यांनी बांधकाम व्यावसायात यश मिळविलेले आहे. भुकन हे ” रेरा ” कायद्यानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार आहेत.अंबिका रेसिडेन्सी येथे 2BHK चे ८४ फ्लॅट आणि 3BHK चे १४ फ्लॅट आणि जिम क्लब हाऊस योगा सेंटर असे एकूण १०० फ्लॅटचे बांधकाम करणार आहेत. सात मजली तीन टॉवर्समध्ये हे बांधकाम होणार आहे.या निवासी इमारतींमध्ये दोन बीएचके आणि थ्री बीएचके फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. अंबिका रेसीडेन्सी या ईमारतीने आष्टीच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे असे भीमराव धोंडे यांनी यावेळी सांगीतले.
प्रस्ताविक करताना इंजि. बाळासाहेब भुकन म्हणाले की, अंबिका रेसीडेन्सी इमारतींपासून १२ मीटर रुंदीचा डीपी रोड मंजूर आहे.येथील रहिवाशांसाठी ही मोठी सुविधा आहे या तीनही इमारतींमध्ये आष्टी नगर पंचायतद्वारे आणि कन्स्ट्रक्शन कंपनी यांचेकडून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बायोमेट्रिकल लिफ्ट बसवण्यात येणार असल्यामुळे अनोळखी नागरिकांना या इमारतीत प्रवेश करता येणार नाही.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही मोठी सोय होणार आहे.या सर्व फ्लॅटचे वास्तु शास्त्रानुसार बांधकाम करण्यात येणार आहे.सर्व इमारतींना कॉमन लाईटसाठी सोलर सिस्टिमद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या निग्रणीखाली संपूर्ण परिसर येणार आहे.सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.या परिसरामध्ये जिम क्लब हाऊस योगा सेंटर चिल्ड्रन पार्क आणि खुल्या जागेमध्ये बाग बगीचा तयार करण्यात येणार आहे.अंबिका रेसिडेन्सीच्या सर्व फ्लॅटचे बांधकामाचा कालावधी २४ महिने एवढा असून फ्लॅट बुकिंग लवकर झाल्यास हा कालावधी कमी देखील होऊ शकतो.अंबिका रेसिडेन्सीच्या बांधकामासाठी स्वतंत्र आरपीसी प्लांट उभा करण्यात आला आहे. त्याद्वारे अधिक गतिमान पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे फ्लॅटची बुकिंग करण्यासाठी १ लाख रु. एवढी रक्कम भरावी असे आवाहन इंजि.भुकन यांनी केले.
यावेळी भाजपनेते शंकर देशमुख, ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे, ह.भ.प.राऊतदादा महाराज, किशोरनाना हंबर्डे ,संजयशेठ मेहेर, रविशेठ ओस्वाल,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाचे बहारदर सुत्रसंचलन निलेश दिवटे यांनी तर उपस्थितांचे आभार गोकुळ धोंडे यांनी मानले.