आष्टी (प्रतिनिधी) कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी दु.3 वा.कडा येथील बाजार समिती आवारामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री सुरेश धस तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासाक पंजाबराव डक तसेच भाजपाचे आष्टी तालुकाध्यक्ष अँड.साहेबराव मस्के विशेष प्रमुख उपस्थिती असणार राहणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कर प्राप्त बीड जिल्ह्यातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.यामध्ये प्रियंका गणेश सावंत ,केशव श्रीरंग रसाळ ,बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे ,श्रीमती विजया गंगाधर घुले ,संजय ज्ञानोबा शिंदे,मोहन निवृत्ती पवार ,राजेंद्र भानुदास देवरवाडे,अमोल भास्कर मुळे, मुक्ताराम शिवाजी सोनवणे, अर्जुन जनार्दन चव्हाण ,विनायक देशमुख यांचा समावेश आहे.तरी आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.