आष्टी (प्रतिनिधी) श्री क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील आणि भगवान भक्ती गडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला या दोन्ही मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी हजेरी लावली आष्टी तालुक्यातील अनेक उद्घाटन समारंभ साठी उपस्थित राहून अगोदर त्यांनी नारायण गडाच्या पायथ्याशी जाऊन नगद नारायण महाराजांच्या चरणस्पर्श करून नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर थेट सावरगाव येथील भगवान भक्ती गडावरील आ.पंकजा मुंडे आयोजित करीत असलेल्या दसरा मेळाव्या मध्ये सहभागी झाले पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना ते व्यासपीठावर पोहोचले पंकजाताई मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच व्यासपीठावरील आ. मोनिका राजळे आ.मेघना बोर्डीकर साकोरे आ. नमिता मुंदडा माजी खासदार सुजय विखे पाटील माजी राज्यमंत्री सुरेश धस माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार महादेव जानकर यांचा उपस्थितीबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला.