spot_img
spot_img

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी करण गोल्हार याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी करण तुळशीराम गोल्हार याची 55 किलो वजनी गटातून 17 वर्षे वयोगटाखालील गिरको रोमन्स या कुस्ती प्रकारात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे साठी निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात करण गोलार याने प्रथम क्रमांक मिळवला असुन पुणे येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. आष्टी येथील महाराष्ट्र केसरी व प्रसिद्ध मल्ल सईद चाऊस , जालिंदर पोकळे व करण गोल्हार याचे वडील तुळशीराम गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव केला असून शाळेतील प्रशिक्षक संतोष सायकड, क्रीडा संयोजक सय्यद वाहेद यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. त्यांने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा नियामत बेग, नगरसेवक अस्लम बेग, मिर्झा उबेद बेग,शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार जावेद पठाण, मुख्याध्यापिका नसरीनबाजी, प्रभारी मुख्याध्यापक सय्यद शफी,सहशिक्षक संदेश जगताप, हनुमंत पोकळे ,श्रीमती अर्चना हजारे, मंजुश्री गोरे, शेख वसीम, एमडी लटपटे, वाहेद भाई आदींनी अभिनंदन केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!