spot_img
spot_img

मच्छिंद्रनाथ गडाप्रमाणेच,रेणूकाई देवस्थान भाविक-भक्तांसाठी पर्यटन स्थळ करणार – सुरेश धस

आष्टी(प्रतिनिधी) मतदारसंघातील सावरगांव मच्छिंद्रनाथ गड,आष्टी पिंपळेश्वर मंदिर,नागतळा नागनाथ देवस्थान, पिंपळवंडी आश्वलिंग देवस्थान, वाळूंज भैरवनाथ देवस्थान,
मुर्शदपुरचे माऊली मंदिर या सर्व देवस्थानसाठी आपण भरभरून निधी दिला आणि त्याप्रमाणेच बेलगांवच्या रेणूकामातेच्या विकासाची भरभरून निधी दिला आणि भविष्यात हे मोठे तिर्थ पर्यटन स्थळ करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुक्यातील बेलगांव येथे 12 कोटी ३१ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवार (दि.७)रोजी सकाळी १० वा.माजीमंत्री सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.साहेबराव म्हस्के, रावसाहेब पोकळे,नगराध्यक्ष जिया बेग, कल्याण पोकळे,सरपंच प्रविण वारे,माजी पं.स.सदस्य किरण पोकळे,खंडु जाधव, आत्माराम फुंदे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना धस म्हणाले,रेणुकामाता मंदिरास ४ कोटी,बेलगांव ते मांडवा रस्ता ३ कोटी व जलजीवन काम असे एकूण बारा कोटी ३१ लक्ष रूपायांची कामे येथे मंजूर केले आहेत.जलजीवन योजना ही देशाचे पंतप्रधान यांनी लक्ष घालून देशातील प्रत्येक गावात जल और नल ची योजना प्रभावीपणे राबवली आहे.सार्वजनिक कामे कसे करायची याचे उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर आपल्या मतदारसंघातील कुसूळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाहा मग कळेल की,काम कसे असावे. बेलगांवचे सरपंच प्रविण वारे म्हणाले, आत्तापर्यंत बेलगांवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कोणीच दिला नाही.मात्र,धस आण्णांनी आपल्या गावाला एकाचवेळी १२ कोटी निधी देणारा एकमेव नेता ठरला आहे.आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामे करून गावचा कायापालट करणार असल्याचे वारे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृत पोकळे यांनी केले तर आभार शिंदे मामा यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!