spot_img
spot_img

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान नवसाला पावणारी देवळाली येथील मेंढवाडीची देवी

देवळाली (प्रतिनिधी):-
आष्टी तालुक्यातील देवळाली गावचे आराध्य दैवत असलेल्या मेंढवाडी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे विशेष करून तरुणांच्या सहभाग असतो गावातील तरुण ज्योत आणण्यासाठी तुळजापुरला जातात तुळजापूर ते देवळाली अशी पायी दिंडी तरुणाई काढते आणि येताना तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिरापासून भेटती ज्योत घेऊन तरुण अनवाणी पायी येतात गावात आल्यावर वाजत गाजत मेंढवाडी देवीच्या मंदिरापर्यंत आणतात मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रम असतात भाविक भक्तांचे दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते मंदिरावर आकर्षक रोषणाई केलेली असून मंदिर गाभाऱ्यात पानाफुलांची सजावट करण्यात आली आहे

मंदिर हे देवळाली गावाच्या आग्नेय दिशेस असलेल्या डोंगरावर आहे श्री जगदंबा मातेचे मंदिर हे खूप विलोभनीय असून तुळजापूर देवीचे एक शक्तिपीठ आहे भक्ताच्या नवसाला पावणारी आणि इच्छापूर्ती करणारी श्री जगदंबा माता एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दोन सुंदर अशा मूर्ती असून एक तुळजापूरची देवी तर दुसरी मेंढवाडी देवी असे एकत्र असलेले देवीचे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव आहे देवीच्या मंदिराची भव्य दिव्य बांधकाम हे लोकवर्गणीतून करण्यात आले आहे मंदिर परिसरामध्ये एक मोठी उंच अशी दीपमाळ आहे व यज्ञकुंड घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना होऊन अष्टमीला मोठा यज्ञ होऊन नवमीला पूर्णाहुती होते नवरात्रीच्या कालावधीत केलेल्या नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक वाजत गाजत गावातून काढून मंदिरापर्यंत आणली जाते तेथे आणल्यावर देवी भक्ताच्या अंगावर झेप घेते हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात व नंतर देवीला पालखीत घालून वाजत गाजत सीमोल्लंघनासाठी माळरानावर एक किलोमीटर पर्यंत नेले जाते व तेथे गेल्यावर देवीची आरती करून परत आल्यावर मंदिराभोवती वाजत गाजत पाच प्रदक्षिणा होतात नंतर देवी पलंगावर ठेवली जाते पाचव्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमेला ‌‌‍कोजागिरी पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते महाराष्ट्रातील भक्तमंडळी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने या दिवशी पैठण व नागतळा येथून कावडीने आणलेल्या पाण्याने देवीचा अभिषेक केला जातो हा उत्सव घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी यात्रेनंतर सर्व कार्यक्रमाची सांगता होते

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!